हेमिल्टन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या सीरीजमधली तिसरी मॅच आज हेमिल्टनच्या सेडॉन पार्कवर रंगत आहे. जर आजचा सामना भारताने जिंकला तर भारत न्यूझीलंडच्या धरतीवर इतिहास रचणार आहे. न्यूझीलंडच्या धरतीवर पहिल्यांदा टी-20 सीरीज जिंकण्य़ाची संधी भारताकडे आहे. भारत या सीरीजमध्ये २-० ने आघाडीवर आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत आधी बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल ओपनिंगला मैदानावर उतरले आहेत. २३ बॉलमध्ये रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकत आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताला आधी बॅटींग करण्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे. विराट कोहलीने आजच्या सामन्यासाठी टीम इंडियात कोणताच बदल केलेला नाही. न्यूझीलंडने ब्लेयर टिकनेरच्या जागी स्कॉट कुग्गेलॅनला संघात घेतलं आहे.


भारतीय टीम: रोहित शर्मा, लोकेश राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी.


न्यूझीलंड टीम: मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), कॉलिन डी ग्रँडहोम, मिशेल सेंटनर, टिम साउदी, ईश सोढी, स्कॉट कुग्गेलॅन, हामिश बेनेट.