Shikhar Dhawan birthday : टीम इंडियाचा (Team India) गब्बर म्हणजेच शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. काल त्याने त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला. टीम इंडियाने त्याचा हा वाढदिवस त्याच्या चांगला लक्षात राहिल अशा पद्धतीने साजरा केलाय. दरम्यान शिखरने त्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर (Social Media) केला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना एक गोष्ट खटकली आहे.


टीम इंडियाने Shikhar Dhawan चा वाढदिवस बनवला खास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशाविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचा अवघ्या एका विकेटने पराभव झाला. पहिल्या सामन्यानंतर संपूर्ण टीम इंडियाने शिखर धवनचा वाढदिवस साजरा केला. यावेळी टीम इंडियामधील बरेच खेळाडू उपस्थित होते. टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी देखील हजेरी लावली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, टीम इंडियासोबत वाढदिवस, असं त्याने कॅप्शन दिलं होतं. 


विराट आणि रोहित अनुपस्थित


शिखर धवनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये के.एल राहुल, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, राहुल द्रविड आणि वॉशिंग्टन सुंदर मजा करताना दिसले. मात्र यावेळी चाहत्यांना एक गोष्ट खटकली ती म्हणजे, टीम इंडियाचा कर्धणार रोहित शर्मा आणि विराट कोहली उपस्थित नव्हते. यामुळे चाहत्यांच्या मनात, टीम इंडियामध्ये सगळं आलबेल आहे ना?, असा प्रश्न उपस्थित होतोय.



उद्या दुसरा वनडे सामना


टीम इंडिया विरूद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये 3 सामन्यांची सिरीजमधील दुसरी वनडे उद्या शेर-ए-बांग्‍ला स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. मुख्य म्हणजे, रोहित सेनेसाठी हा मुकाबला 'करो या मरो'च्या स्थितीचा असणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात एका विकेटने पराभव झाल्यानंतर उद्याची वनडे जिंकणं टीम इंडियासाठी (Team India) गरजेचं असणार आहे. सिरीज जिंकण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. 


कशी असेल उद्याच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर.