मुंबई : टीम इंडियाने तिसरा टी 20 सामना गमवला पण सीरिजवर आपलं नाव कोरलं. आता वन डे सीरिजमध्ये मात्र दुसरा वन डे सामना गमवावा लागला आहे. टीम इंडिया-इंग्लंडने सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता तिसरा सामना कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसऱ्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा संतापल्याचं दिसलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला वन डे सामना जिंकला तर दुसरा गमावला. दुसरा सामना गमावल्यानंतर रोहित शर्माने काही खेळाडूंना यासाठी जबाबदार ठरवलं. टीम इंडियासमोर 246 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र 146 धावांवर टीम ऑलआऊट झाली. 100 धावांनी इंग्लंडने हा सामना जिंकला आहे. 


रोहितने सांगितलं पराभवाचं कारण 
या पराभवामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच नाराज होता. रोहितने या पराभवासाठी टीममधील काही खेळाडूंना जबाबदार धरले.  फलंदाजांवर रोहितने नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर रोहित म्हणाला, 'आम्ही सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. आमच्याकडून अनेक कॅचही सुटले. फलंदाजांकडून जास्त अपेक्षा होत्या असंही रोहित म्हणाला. 


रोहित शर्मा शून्यवर तर शिखर धवन 9 धावा करून परतला. विराट कोहलीने 16 धावा केल्या. तर पंतही शून्यवर आऊट झाला. हार्दिक पांड्या आणि जडेजाने 29-29 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 27 धावांचं योगदान दिलं. रोहित शर्मा फलंदाजांवर जास्त नाराज असल्याचं पाहायला मिळालं.