मुंबई : पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा भारताने 6 विकेट्सने पराभव केला. हा सामना जिंकून टीम इंडियाने टी-20 सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीये. दरम्यान सामन्यात विजय मिळवल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा काही खूश दिसला नाही. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने काही खेळांडूवर राग काढला. यावेळी त्याने कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्याचा रोख कोहलीकडे असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 158 रन्सचं लक्ष मिळालं होतं. सहजरित्या गाठता येणारं हे लक्ष टीम इंडियाला पूर्ण करण्यात अडचणी आल्या. यावेळी काही खेळाडूंमुळे हातातला सामना गमावण्याची भीती होती.


वेस्ट इंडिजचं लक्ष गाठताना विराट कोहलीने 17 रन्स केले. तर त्यापाठोपाठ ऋषभ पंतही 8 रन्स करून माघारी परतला. या दोन्ही खेळाडूंमुळे सामना हरण्याची शक्यता वाटत होती. 


सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही खेळाडूचं नाव न घेता म्हणाला, 'आम्ही सामना थोडा लवकर संपवू शकलो असतो. मात्र आम्ही तसं केलं नाही. तरीही या विजयाने आम्ही खूश आहोत. यामुळे पूर्ण टीमला आत्मविश्वास मिळाला आहे. फलंदाजांनी त्यांच्यात थोडी सुधारणा करणं गरजेचं आहे.'


श्रेयसऐवजी या खेळाडूला जागा


श्रेयस अय्यरऐवजी टीम इंडियामध्ये वेंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) संधी देण्यात आली होती. अय्यरने एक ओव्हरमध्ये केवळ 4 रन्स दिले. कालच्या एका क्षणी टीम इंडिया कठीण परिस्थितीत दिसत असताना वेंकटेश अय्यरने टीमला काही प्रमाणात सांभाळलं. शिवाय त्या नाबाद 24 रन्सही केले.


रोहित शर्मा म्हणाला, आम्हाला खेळाच्या मध्ये गोलंदाजी करणारा एखादा खेळाडू हवा होता. यासाठी पहिल्या सामन्यात प्लेईंग 11मध्ये त्याचा समावेश करण्यात आला नाही. खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत यापेक्षा मी आव्हानांचा सामना करण्यावर भर देतो. त्यामुळे आम्ही श्रेयससंदर्भात निर्णय घेतला होता.