Rohit Sharma: कधी सुधारणार हिटमॅन? ड्रेसिंग रूममध्ये रोहितकडून चहलला मारहाण, पाहा Video
Rohit Sharma: शनिवारी झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) युझवेंद्र चहलला मारहाण करताना दिसतोय. युझवेंद्र चहलचा देखील प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता.
Rohit Sharma: वेस्ट इंडिज विरूद्ध भारत ( Ind vs Wi ) यांच्यामध्ये बारबाडोस या ठिकाणी दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव झाला. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) टीममध्ये नसताना भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या सामन्यात युझवेंद्र चहलचा देखील प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. अशातच शनिवारी झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) युझवेंद्र चहलला मारहाण करताना दिसतोय.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताच्या दुसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्या कर्णधारपदासाठी मैदानात उतरला होता. वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्या प्रमुख खेळाडू रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती. यावेळी सामना सुरु असताना दोन्ही खेळाडू इतर खेळाडूंसोबत डगआउटमध्ये मस्ती करताना दिसले.
मैदानावर आणि मैदानाबाहेर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चा मजा-मस्करीचा अंदाज आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. अशातच डगआऊटमध्ये बसून रोहित मस्ती करताना दिसला. यावेळी रोहित शर्मा युजवेंद्र चहलसोबत मस्ती करत होता. रोहितने चहलला चांगलेच फटके दिले. याचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.
रोहितने चहलला केली मारहाण
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) , युझवेंद्र चहल, विराट कोहली आणि जयदेव उनाडकट डग आऊटमध्ये बसले होते. यादरम्यान रोहित चहलसोबत मस्ती करताना दिसला. कॅमेरा रोहितकडे गेला तेव्हा रोहित चहलच्या खांद्यावर थोपटताना दिसला. यावेळी विराट कोहली आणि जयदेव उनाडकट बाजूला बसून खो-खो हसत होते.
वेस्ट इंडिज फलंदाजी करत असताना 23 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. मुख्य म्हणजे, जेव्हा रोहितला ( Rohit Sharma ) कॅमेरा आपल्याकडे आल्याचं त्याला समजलं तेव्हा त्याने टोपीखाली चेहरा लपवला. मात्र या दोघांची मस्ती कॅमेरात कैद झाली असून चाहत्यांना मात्र हा व्हिडीओ फार आवडला आहे.
दुसऱ्या वनडेत भारताचा पराभव
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीविना टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली नाही. अवघ्या 40.5 ओव्हर्समध्ये टीम इंडियाचा ऑलआऊट झाला. भारताची धावसंख्या एकही विकेटशिवाय 90 धावा होती. पण त्यानंतर 91 धावांत टीम इंडियाने 10 विकेट गमावल्या. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक 55 रन्स केले. भारताने वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी १८२ रन्सचं लक्ष्य दिलं. अखेर 4 विकेट्स गमावून वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला.