मेलबर्न : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T20 World Cup 2022) आजपासून सुरुवात झाली आहे. टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कारण टीम इंडियाचा पहिलाच सामना हा हायव्होल्टेज सामना आहे. रोहितसेना पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) भिडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डपूर्वी सुरु होण्यापूर्वी सर्व टीम्सच्या कर्णधारांचं खास फोटोशूट करण्यात आलं. मात्र हे फोटोशूट एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलंय. अनेकांनी या फोटोशूटवर मीम्स तयार केलेत. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी टीमचा कर्णधार बाबर आझम यांनी एकत्र फोटोशूट केलं.


या फोटोशूटमध्ये दोन्ही टीमचे कर्णधार मजामस्ती करताना दिसले. यासोबतच दोघांनी समोरासमोर उभे राहून फोटोही काढले. क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तानमधील युद्ध किती महत्त्वाचं आणि मोठं हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळेच आयसीसीने कर्णधारांचे फोटोशूट अशा प्रकारे करवून घेतलं.




दरम्यान या दोन्ही कर्णधारांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ट्विटरवर अनेकांनी विविध प्रकारचे मीम्स बनवले. यावेळी एका युझरने प्री-वेडिंग फोटोशूट केलं असल्याची कमेंट केली.


काही लोकांनी ट्विट करत दोघांची जोडी करण-अर्जुनसारखी दिसते, असं म्हटलंय. तर काहींनी लिहिलंय, अरे भाऊ, प्री-वेडिंग शूट का करताय? असा सवाल केला आहे. इतकंच नाही तर एका व्यक्तीने सामन्याचा दिवस आणि वेळ घेऊन पत्रिका देखील तयार केली आहे.