मुंबई : रोहित शर्माने कर्णधारपद स्विकारल्यानंतर पहिल्याच सामन्यात विजयी सलामी मिळवून दिली. वेस्ट इंडिजविरूद्ध सुरु असलेल्या मालिकेत भारताने पहिला विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र पहिल्या सामन्यात दोन खेळाडूंची कामगिरी अत्यंत खराब दिसली. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने गोलंदाज शार्दुल ठाकूरला संधी दिली. मात्र ठाकूर हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही.  शार्दूलने 7 ओव्हरमध्ये 38 रन्स दिले शिवाय त्याला एकही विकेट काढता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात टीममध्ये दीपक चहरचा समावेश होण्याची शक्यता आहे.


भारताचा उत्तम सलामिवीर शिखर धवन पहिल्या वनडे सामन्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला. अशा परिस्थितीत इशान किशनला वेस्ट इंडिजविरुद्ध संधी मिळाली. मात्र इशान किशनला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात त्याने केवळ 28 रन्स केले. अशा परिस्थितीत दुसऱ्या वनडेत इशान किशनच्या जागी मयंक अग्रवालला संधी दिली जाऊ शकते. 


तर दुसऱ्या वनडे सामन्यात के.एल राहुल कमबॅक करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जर मयंक अग्रवालला ओपनिंगला आला तर राहुल मधल्या फळीत खेळू शकतो. मधल्या फळीत खेळताना राहुलने यापूर्वी अनेक मॅचविनिंग इनिंग्स खेळल्या आहेत.