Rohit Sharma: बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या वनडे (IND vs BAN 1st ODI) सामन्यात टीम इंडियाचा अवघ्या 1 विकेटने पराभव झाला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने फार वाईट फलंदाजी करत बांगलादेशाला 186 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. यावेळी बांगलादेशाने 9 विकेट्स गामावून हे लक्ष्य पूर्ण केलं. बांगलादेशाविरूद्ध टीम इंडियाची बॅटींग लाईन पत्त्याप्रमाणे कोसळली. अनेकांनी शेवटचा कॅच सोडल्यामुळे के.एल राहुलला (KL Rahul) पराभवाला कारणीभूत ठरवलंय. मात्र रोहित शर्माच्या एका चुकीचा देखील हा परिणाम आहे.


रोहित शर्मा नेमका कुठे चुकला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्माने पहिल्या सामन्याची प्लेईंग 11 निवडताना चुकला. या चुकीची शिक्षा संपूर्ण टीम इंडियाला भोगावी लागली. ओपनर म्हणून शिखर धवन फ्लॉप झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. पहिल्या वनडे सामन्यात अवघ्या 7 रन्सवर धनव पव्हेलियनमध्ये परतला. धवनच्या जागी जर ईशान किशनला संधी दिली असती तर कदाचित रिझल्ट काही वेगळा असता.


शिखर धवन टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देण्यासाठी अपयशी ठरला. त्याचसोबत रोहित शर्मानेही त्याची विकेट गमावली. यानंतर रोहित देखील काही मोठी कामगिरी करू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजमध्ये इशानने 93 रन्सची उत्तम खेळी केली होती. त्यामुळे कालच्या सामन्यात त्याचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकलं असतं.


वर्ल्डकपच्या तयारीमध्ये शिखर फेल


टी-20 वर्ल्डकमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया आगामी वर्ल्डकप 2023 साठी तयारी करतेय. बांगलादेश दौऱ्यावर खेळाडूंना संधी देण्याचे कर्णधार आणि कोचनेही मान्य केलंय. अशा परिस्थितीत शिखर धवनचा फॉर्म पाहता प्लेइंग 11 मध्ये मिळणं कठीण होतं. त्याच्या जागी युवा स्फोटक फलंदाज म्हणून ईशान किशनने त्याचा ठसा उमटवला आहे.


पहिल्या वनडेत झालेल्या पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा


पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे. रोहित शर्मा म्हणाला की, "हा सामना फार चुरशीचा होता. आम्ही त्या परिस्थितीमध्येही कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. चांगली फलंदाजी आजच्या सामन्यात आमच्याकडून झाली नाही. मात्र आम्ही आज गोलंदाजी फार चांगली होती. 40 ओव्हर्समध्ये आम्ही चांगली गोलंदाजी करत विकेट्सही काढले. लक्ष्य म्हणून आमच्याकडे जास्त रन्स नव्हते."