Rohit Sharma : कोरोना पॉझिटीव्ह रोहितकडून मोठे संकेत; इंग्लंडविरूद्धची टेस्ट खेळणार?
यासंदर्भात आता रोहित शर्माने स्वतः याबाबत संकेत दिले आहेत.
मुंबई : भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माला लीसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तर आत भारताला 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळायचा आहे. गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहितची अशी परिस्थिती टीम इंडियासाठी मोठी समस्या बनू शकते. रोहितला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयसाठी कर्णधार निवडीची प्रक्रिया खूप कठीण असणार आहे.
दरम्यान रोहितला कोरोनाची लागण झाल्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या टेस्ट सामन्यात तो खेळणार का नाही, याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न आहे. मात्र यासंदर्भात आता रोहित शर्माने स्वतः याबाबत संकेत दिले आहेत.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा इशारा दिला आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने थम्स अप केलंय. त्याचे हावभावही त्याला बरे वाटतं असल्याचे संकेत देतायत. या पोस्टनंतर इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सामन्यापूर्वी रोहित पुन्हा तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे.
इंग्लंड विरुद्धच्या 5 व्या सामन्यात मयंकला संधी
दरम्यान टीम इंडियाची सिनिअर टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी रोहितला कोरोना झाला. त्यामुळे रोहितची या। कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे कव्हर खेळाडू म्हणून मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.