मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन टेस्टचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला. इंग्लंडने 7 विकेट्स राखून हा सामना जिंकला. कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पराभवाची चव चाखली. दरम्यान रोहित शर्माला कोरोना झाला होता, त्यामुळे तो हा टेस्ट सामना खेळू शकला नाही. मात्र सामन्याच्या पाचव्या दिवशी टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर पोहोचला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एजबॅस्टन कसोटीच्या शेवटच्या दिवशी नियमित कर्णधार रोहित शर्मा भारतीय टीममध्ये दाखल झाला होता. तो मैदानावरही दिसला. यापूर्वी, कोरोनामधून बरं झाल्यानंतर त्यांनी सराव सुरू केला आहे. याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित ऑफस्पिनर आर अश्विनसोबत प्रॅक्टिस करताना दिसतोय.


इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन टेस्टपूर्वी रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. यामुळे तो पूर्ण चार दिवसांचा सराव सामनाही खेळू शकला नाही. आता त्याचे दोन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याने 7 जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सरावही सुरू केला आहे. यामुळे तो पहिल्या टी-20मध्ये खेळेल आणि टीमचं नेतृत्वही करेल अशी आशा निर्माण झालीये.



टीम इंडिया हॉटेलमधून मैदानावर पोहोचताच टीम बसमध्ये रोहित शर्माही उपस्थित होता. यानंतर तो टीम इंडियासोबत मैदानावरही दिसला. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने एजबॅस्टन कसोटीत भारतीय टीमची धुरा सांभाळली.