ऍडलेड : ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये त्रिशतक केलं. वॉर्नर टेस्ट क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर करण्याच्या जवळ होता, पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. पेनच्या या निर्णयामुळे वॉर्नर ३३५ रनवर नाबाद राहिला. वॉर्नरला लाराचा ४०० रनचा विक्रम मोडता आला नसला, तरी रोहित शर्मा हा विक्रम मोडू शकतो, असं वॉर्नर म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रायन लाराने २००४ साली इंग्लंडविरुद्ध ४०० रनची खेळी केली होती. टेस्टक्रिकेटमधला दुसरा सर्वाधिक स्कोअर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनच्या नावावर आहे. हेडनने झिम्बाब्वेविरुद्ध ३८० रन केले होते. डेव्हिड वॉर्नर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोअर करणाऱ्यांच्या यादीत १०व्या क्रमांकावर आहे.


'ऑस्ट्रेलियामध्ये बाऊंड्री लाईन खूप लांब आहे, त्यामुळे प्रत्येकवेळी फोर-सिक्स मारणं कठीण असतं. जेव्हा तुम्ही थकता तेव्हा हात चालत नाहीत. मी शेवटी काही शॉट्स उचलून मारले, कारण आता सीमा रेषा पार करू शकत नाही, हे मला कळून चुकलं होतं. एक दिवस हे रेकॉर्ड तुटेल आणि रोहित हे रेकॉर्ड तोडेल,' असं वक्तव्य वॉर्नरने केलं आहे.


वॉर्नरने पहिल्या टेस्टमध्ये १५४ रनची खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने नाबाद ३३५ रन केले. कोणत्याही ऑस्ट्रेलियन बॅट्समनचा हा दुसरा सर्वाधिक स्कोअर आहे. वॉर्नरने या खेळीसोबतच डॉन ब्रॅडमन आणि मार्क टेलर यांच्या प्रत्येकी ३३४ रनचा विक्रम मोडीत काढला.