आस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामन्यासाठी रोहित शर्मा कर्णधार, टीम इंडियात बदल
आयसीसी टी -20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, भारतीय संघ त्यांच्या शेवटच्या सराव सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर आला आहे.
दुबई : आयसीसी टी -20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, भारतीय संघ त्यांच्या शेवटच्या सराव सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजी जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या गोलंदाजी हल्ल्यासमोर असेल. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा उतरला आहे. कर्णधार विराट कोहलीला कर्णधार म्हणून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण तो संघात खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघ 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. याआधी संघाला दोन सराव सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जात आहे.
नाणेफेक करताना रोहित म्हणाला, कोहली, बुमराह आणि शमी आजच्या सामन्यात खेळत नाहीत, त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. आम्हाला आधी खेळायचे होते आणि जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या. आमच्याकडे सहा गोलंदाजांचा पर्याय आहेत याची खात्री करायची आहे, फलंदाजीमध्येही समान पर्याय असावेत.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या सामन्यात गोलंदाजी करणार नाहीत. ऋषभ पंतच्या जागी इशान किशन यष्टीरक्षणाची जबाबदारी घेईल. सर्वात महत्वाचे कर्णधार म्हणून आज विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा दिसत आहे.