मुंबई : भारतीय क्रिकेट टीम गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर पोहोचली आहे. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. यासाठी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराहसह जवळपास संपूर्ण टीम इंग्लंडला पोहोचला आहे. मात्र यांच्यासोबत टीमचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडला रवाना झाला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा इंग्लंडला रवाना झालेल्या टीमसोबत दिसला नाही. तो अजून टीमसोबत इंग्लंडला रवाना झालेला नाही. अशा स्थितीत अनेक प्रकारच्या अफवांना आता उधाण आलं आहे. यासोबतच रोहितच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत.


रोहित 20 जूनला इंग्लंडला रवाना होणार 


रोहित शर्मा नुकताच आपल्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करून परतला आहे. तो 20 तारखेला ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह इंग्लंडला जाणार आहे. त्याच तारखेला भारतीय टीमलाही दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंडला रवाना व्हायचंय. आयर्लंड मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून, त्याचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलंय.



भारतीय टेस्ट टीम


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.