India vs Australia 1st Test Nagpur: गुरुवारपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border–Gavaskar Trophy) सुरुवात झाली असून नागपूरमध्ये पहिला टेस्ट सामना खेळवला जातोय. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच टीम इंडियाचं (Team India) वर्चस्व पहायला मिळालं. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाची भक्कम ओपनिंग जोडी तोडण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना यश आलं. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि मोहम्मद शमीने (Mohammed Shami) येताच या दोन्ही फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान यामध्येच रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


रोहित शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशमनध्ये सुरु असलेल्या टेस्ट सामन्यामधील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये कर्णधार रोहित शर्मा वेगवाग गोलंदाज मोहम्मद सिराजचं उष्ट पाणी पिताना दिसतोय. रोहित शर्माचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांना फार आवडतोय. सगळेजण रोहितच्या या कृत्याचं कौतुक करताना दिसतायत. ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान जयदेव उनाडकट पाण्याची बाटली घेऊन मैदानात आला होता. 


सिराजने उष्टवलेलं पाणी प्यायला रोहित


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मोहम्मद सिराज ज्या बाटलीतून पाणी पित होता, त्याच बाटलीतून रोहित पाणी प्यायला. रोहित-सिराज यांच्यामध्ये असणारं हे प्रेम पाहून चाहते चांगलेच खूश आहेत. 



177 स्कोरवर ऑल-आऊट झाली ऑस्ट्रेलिया


ऑस्ट्रेलियासाठी सामन्याचा पहिला दिवस फारच खराब गेल्याचं दिसून आला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने अवघ्या 2 रन्सवर ओपनर जोडी गमावली. यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी मिळून ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. दोघांमध्ये 82 रन्सची पार्टनरशिप झाली. मात्र या दोघांची जोडी तोडण्यात रविंद्र जडेजाला यश मिळालं. ह


भारतीय गोलंदाजांची कमाल


कॅप्टन पॅट कमिन्सचा (Pat Cummins) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फेल ठरला. सुरूवातीला रोहितने मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपवला. त्याचं फळ टीम इंडियाला मिळालं. 2 धावांच्या स्कोअरवर कांगारू टीमला पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजा तीन चेंडूत एक धाव काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 15 षटकांत 2 गडी गमावून 36 धावा केल्या होत्या.  त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही.