Hardik Pandya become captain Of Mumbai Indians : एक दोन नव्हे तर पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल 2024 साठी हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव कर्णधार म्हणून जाहीर केलं. गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये परतलेल्या हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आल्याची घोषणा आज पलटणने केली. नव्या दमाच्या पांड्याच्या खांद्यावर जबाबदारी देऊन मुंबईने मोठी खेळी केल्याची चर्चा होत आहे. मात्र, दुसरीकडे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांनी नाकं मुरडली आहेत. रोहितला यंदाच्या हंगामात कॅप्टन्सी देयला पाहिजे होती, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. तर हार्दिक पांड्या ट्रोल होत असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे मुंबईने खरंच लंगड्या घोड्यावर डाव लावलाय का? असा सवाल विचारला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स संघाने 2013 मध्ये पहिलं विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यामुळे ज्या कॅप्टनने मुंबई इंडियन्सला ब्रँड निर्माण करून दिला. त्याच रोहितला डच्चू देण्यात आल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स नाराज आहेत. हार्दिकने गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिलं असलं तरी मुंबईच्या फॅन्सचा पांड्यावर विश्वास का नाही? असा सवाल विचारला जातोय.


हार्दिकचा फिटनेस


गेल्या अनेक वर्षांपासून हार्दिक पांड्याच्या खेळात सातत्य दिसत नाही. हार्दिक पांड्याच्या फिटनेसमुळे त्याच्यावर अनेकदा टीका होते. वर्ल्ड कपच्या मध्यातच त्याला संघाबाहेर जावा लागलं होतं. त्यानंतर त्याला बरं होण्यासाठी कमीतकमी 4 महिन्याचा कालावधी लागला होता. अशातच आता मुंबईने योग्य खेळाडूला कॅप्टन केलंय का? असा सवाल विचारला जातोय.


हार्दिकला कायम ठेवणार?


मुंबईच्या संघाने सर्वात महागडा खेळाडू संघाबाहेर करत हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात सामील केलंय. 15 कोटी रुपये किंमत मोजत मुंबईने आपल्या पांड्याला संघात घेतलं खरं पण हार्दिकला मुंबई किती काळ कायम ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


सूर्या की पांड्या?


मुंबई इंडियन्सकडे सूर्यकुमार यादव नावाची तोफ आहे. ऑस्ट्रेलिया असो वा साऊथ अफ्रिका... सूर्यकुमार यादवने आपल्या कॅप्टन्सीची जादू दाखवून दिलीये. त्यामुळे एक कॅप्टन असताना हार्दिकला मोठ्या रकमेत खरेदी करून पायावर दगड मारलाय का? अशी चर्चा देखील होताना दिसत आहे.