IND vs BAN 1st ODI : भारत आणि बांग्लादेश (india vs bangladesh) यांच्यात खेळवल्या पहिल्या एकदिवसीय सामना (IND vs BAN 1st ODI) रविवारी पार पडला. या सामन्यात बांग्लादेशने भारताला 1 गडी राखून (Bangladesh Beat India) पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात भारताला फक्त 1 विकेटची गरज होती. मात्र, बांग्लादेशच्या मेहदी हसन (Mehidy Hasan) आणि मुस्ताफिजूर रेहमानने (Mustafizur Rahman) यांनी मैदान सोडलं नाही आणि बांग्लादेशला पहिला विजय मिळवून दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या सामन्यात बांगलादेशाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यांसारखे ढेपाळले. भारताने बांगलादेशासमोर अवघ्या 187 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. कर्धणार रोहित शर्मालाही यावेळी चांगला खेळ करता आला नाही.


दरम्यान पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे. रोहित शर्मा म्हणाला की, "हा सामना फार चुरशीचा होता. आम्ही त्या परिस्थितीमध्येही कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. चांगली फलंदाजी आजच्या सामन्यात आमच्याकडून झाली नाही. मात्र आम्ही आज गोलंदाजी फार चांगली होती. 40 ओव्हर्समध्ये आम्ही चांगली गोलंदाजी करत विकेट्सही काढले. लक्ष्य म्हणून आमच्याकडे जास्त रन्स नव्हते."


"या पराभवासाठी कोणताही मी बहाणा देणार नाहीये. दोन प्रॅक्टिस सेशनमध्ये कितपत सुधारणा करू शकतो, याची मला खरोखर कल्पना नाही. पण मला खात्री आहे की, टीममधील खेळाडू शिकतील. आशा आहे की, आम्ही अनेक गोष्टी बदलू शकतो. या परिस्थितीत काय करायचं आहे याचीही मला माहिती आहे," असंही रोहितने सांगितलंय.


भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी


पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यांसारखे ढेपाळले. भारताने बांगलादेशासमोर अवघ्या 187 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून केवळ उपकर्णधार के.एल राहुलला (KL.Rahul) चांगली आणि मोठी खेळी खेळणं शक्य झालं.