IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 1st Test) यांच्यामध्ये 4 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु झाली असून पहिला सामना भारताने जिंकला आहे. नागपूर टेस्ट मॅच 132 रन्स आणि एका डावाने टीम इंडियाने (Team India) जिंकला आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनीही उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया टीमचा दुसरा डाव अवघ्या 91 रन्सवर ऑलआऊट झाला. मात्र दुसऱ्या डावामध्ये एक चित्र असं दिसून आलं, ज्यामुळे भारतीय चाहते काहीसे नाराज झाले. सामना सुरु असताना टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहलीवर चांगलाच संतापलेला दिसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या डावासाठी कांगारूंची टीम मैदानात उतरली होती. यावेळी डेविड वॉर्नरचा एक सोपा कॅच स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीकडून सुटला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसतोय. 


Virat Kohli ने सोडला सोपा कॅच


विराट कोहली (Virat Kohli) चा फिटनेस प्रत्येकाला माहितीये. मात्र असं असूनही टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची बॅट काही साजेशी कामगिरी करू शकली नाही. तर दुसरीकडे फिल्डींगमध्येही त्याची कामगिरी काही खास झाली नाही. कोहलीने वॉर्नरचा ड्रॉप केलेला कॅचचा व्हिडीओ आता व्हायरल झालाय.


ऑस्ट्रेलिया टीमच्या दुसऱ्या डावाच्या 6 ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर डेव्हिड वॉर्नरचा कॅच विराटने स्लिपमध्ये सोडला. यावेळी वॉर्नरचा कॅच सोडल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि अश्विन चांगलेच संतापलेले दिसले. इतकंच नाही तर कोहली स्वतः देखील त्याच्या फिल्डींगवर नाराज झालेला दिसून आला. 



टीम इंडियाचा मोठा विजय 


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 91 धावातच संपुष्टात आला. 


भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली.  रवींद्र जडेजा, आर अश्विन  यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज फ्लॉप ठरला. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने 1 डाव व 132 धावांनी विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.