लखनऊ : लखनऊमध्ये विडींजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने धडाकेबाज शतक ठोकलंय. रोहित शर्मानं ६१ बॉलमध्ये नाबाद १११ रनची खेळी केली. यामध्ये ८ फोर आणि ७ सिक्सचा समावेश आहे. याचबरोबर रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक रन करणारा फलंदाज ठरलाय. रोहितने विराट कोहलीला मागे टाकलंय. विराटने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ६२ सामन्यांत ४८.८८ च्या सरासरीने २ हजार १०२ धावा केल्या आहेत. तर रोहितने कारकीर्दीतील ८५व्या टी-२० सामन्यात विराटला मागे टाकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंडीजविरुद्धच्या या सामन्यात अकरावी धाव घेताच रोहित भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आता आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक रन बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितनं ८६ टी-२० मॅचच्या ७९ इनिंगमध्ये ३३.८९ ची सरासरी आणि १३८.६४ च्या सरासरीनं २२०३ रन केले आहेत. 


टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे. त्याने ७५ सामन्यांत ३४.४० च्या सरासरीने २ हजार २७१ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक तिसऱ्या स्थानी आहे. त्याने १०६ सामन्यांत ३१.३१ च्या सरासरीने २१६१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम २ हजार १४० धावांसह चौथ्या स्थानी आहे.


आता रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ४ शतकं झाली आहेत. तर कर्णधार म्हणून हे रोहितचं दुसरं टी-२० आंतरराष्ट्रीय शतक आहे. २ शतकं करणारा तो एकमेव कर्णधार आहे. तर आता टी-२०मध्येही सर्वाधिक शतकं रोहितच्या नावावर आहेत.