INDVSNZ| विजयी खेळी सोबतच रोहितने केला `हा` विक्रम
रोहित शर्माने आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळले आहे.
ऑकलंड | न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ विकेटने विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या तुफानी ५० धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला १५९ धावांचे आव्हान सहज पार करता आले. रोहितने आपल्या ५० धावांच्या खेळीत ४ सिक्स आणि ३ फोर ल़गावले. टी-२० कारकीर्दीतील रोहितचे हे १६ वे अर्धशतक होते. याखेळी सोबतच रोहितने आपल्या नावे काही विक्रम केले आहेत.
टी-२० कारकीर्द
रोहित शर्माने आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळले आहे. यात त्याने एकूण २२८८ धावा केल्या आहेत. ११८ ही त्याची टी-२० मधील सर्वोत्कृष्ट खेळी आहे. रोहितने आतापर्यंत आपल्या टी२० कारकीर्दीत ४ शतक तर १६ अर्धशतके लगावले आहेत. तसेच २०४ चौकार तर १०२ सिक्स लगावले आहेत.
पहिला भारतीय
टी-२० मध्ये रोहित शर्माने ११० सिक्स लगावले आहेत. अशी कामगिरी करणारा रोहित भारताचा पहिला तर क्रिकेट विश्वातील तिसरा खेळाडू ठरला आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मार्टिन गुप्टील आणि वेस्ट इंडिजचा क्रिस गेल हे दोघे खेळाडू १०३ सिक्ससोबत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
टी-२० मधील सर्वाधिक धावा
टी -२० या झटपट किक्रेट प्रकारात सर्वात जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. यामुळे मार्टिन गुप्टीलची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गुप्टीलने आपल्या ७६ सामन्यांमध्ये २२७१ धावा केल्या आहेत. यात २ शतक तर १४ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकस तिसऱ्या क्रमांकावर आहे. मलिकने आपल्या टी-२० तील १११ सामन्यांमध्ये २२६२ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने आपल्या ६५ सामन्यांमध्ये २१६७ धावा केल्या आहेत. यात त्याने १९ अर्धशतके लगावली आहेत.