Ajinkya Rahane Rohit Sharma Press Conference: उद्यापासून म्हणजे 12 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies vs India) यांच्यात कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता दोन्ही संघाचे खेळाडू जोरदार तयारी करत असल्याचं दिसतंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. अशातच आता सामन्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्रकाराच्या भूमिकेत दिसून आला. त्यावेळी त्याने अजिंक्य रहाणेची शाळा घेतल्याचं दिसून आलं.


काय म्हणाला रोहित शर्मा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तु या खेळपट्टीवर अनेकवेळा खेळला आहे. तू अनेकदा वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलाय. वेस्ट इंडिजविरुद्ध अनेक रन देखील बनवले आहेत. नवीन खेळाडूंना तू काय सल्ला देशील? असा सवाल रोहित शर्माने विचारला. त्यावर रहाणेने उत्तर दिलं. वेस्ट इंडिजमध्ये खेळताना संयम राखणं गरजेचं आहे, असं रहाणेने सांगितलं. त्यावेळी रोहित शर्माने गुगली टाकली. खेळाडूंना हे कसं पटवून देयचं की, कामाच्या वेळी काम करावं, खेळत असताना 5 वाजल्यानंतर काय करायचं असा विचार करू नये, यावर तु काय सांगशिल? असा सवाल रोहित शर्माने केला. त्यावर देखील अज्जूने संयमाने उत्तर दिलं.


वेस्ट इंडिजमध्ये जेव्हा आपण येतो, तेव्हा ग्राऊंडवर फोकस करणं गरजेचं आहे. ग्राऊंडच्या बाहेर काय करायचं यावर विचार करू नये, असं सांगताना अजिंक्य रहाणेला रोहितच्या प्रश्नाचा नूर समजला. त्यावेळी त्याला खदकन हसायला देखील आलं. त्यावेळी अचानक पावसाने सेकंदात हजेरी लावली आणि सर्वांनी मैदानात पळ काढला. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.


पाहा Video



सराव सामन्यात ऋतुराज गायकवाडची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होईल. डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्याचबरोबर जिओ सिनेमावर देखील सामना पाहता येणार आहे.


आणखी वाचा - IND vs WI: विराट कोहली पुन्हा होणार कॅप्टन? टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरच्या वक्तव्याने खळबळ!


अजिंक्य रहाणेला या वयामध्ये पुनरागमन करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पत्रकाराचा प्रश्न अजिंक्य रहाणेला खुपला. या प्रश्नाला उत्तर देताना रहाणे म्हणतो, या वयात म्हणजे? मी अजूनही तरुण आहे. त्यानंतर रोहित शर्माने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तेवढ्यात पावसाने हजेरी लावल्याचं दिसून आलंय.


कसा आहे भारताचा कसोटी संघ?


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशवी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्रन जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.