Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच सरावादरम्यान रोहित जखमी; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
Rohit Sharma: टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपच्या मिशनची सुरुवात आयरलँडविरूद्धच्या सामन्याने केली. हा सामना टीम इंडियाने जिंकला आणि आता भारत पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
Rohit Sharma: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून 9 जून रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहतायत. मात्र यावेळी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे रविवारी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलंय. यावेळी रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.
टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपच्या मिशनची सुरुवात आयरलँडविरूद्धच्या सामन्याने केली. हा सामना टीम इंडियाने जिंकला आणि आता भारत पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. मात्र याच सामन्यापूर्वी रोहित शर्मा जखमी झाल्याचं समोर आलंय.
रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत
भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू नेटमध्ये सराव करत होते. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. पण नेटमध्ये फलंदाजी करताना एक बॉल त्याच्या अंगठ्याला लागला. त्यानंतर हिटमॅन काहीसा अस्वस्थ दिसत होता. दरम्यान अंदाजानुसार, रोहितची ही दुखापत फारशी गंभीर नाहीये. याचं कारण म्हणजे दुखापतीनंतर काही काळानंतर त्याने पुन्हा फलंदाजीचा सराव सुरू केला.
शुक्रवारी केंटिज पार्कवर नेटमध्ये सराव करत असताना रोहितच्या डाव्या हाताच्या ग्लोव्हमध्ये बॉल लागला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही रोहितच्या खांद्याला बॉल लागला होता. त्यानंतर तो सामना अर्धवट सोडून गेला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी तो सरावासाठी आला होता. श्रीलंकेचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवान त्याला बॉल टाकत होता. अचानक चेंडू उसळला आणि त्याच्या ग्लोव्ह्जला लागला. यावेळी खूप वेदना होत होत्या. तातडीने फिजिओ त्याची तपासणी केली आणि त्याने पुन्हा सराव सुरू केला.
टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.