मुंबई: रोहित शर्माचा पार्टनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेळाडूनं नुकताच आपल्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. याची चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर आणि रोहित शर्माचा IPL मधील जुना पार्टनर मिशेल मार्श यांने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. आपल्या लाँग टाइम गर्लफ्रेंडसोबत त्याने नुकताच साखरपुडा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मिशेल मार्श आपल्या लाँग टाइम गर्लफ्रेंड ग्रेटा मॅकसोबत साखरपुडा केला. त्याने आपल्या इन्स्टावर फोटो शेअर करून चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्या या नव्या आयुष्यासाठी चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ज्या दिवशी मी तिला भेटलो त्या दिवसापासून ती माझं प्रेम आहे. आजचा सर्वात सुंदर दिवस आहे. 




मिशेल मार्शने तिची मैत्रीण ग्रेटा मॅकसोबत एक सुंदर सेल्फी अपलोड केला आहे. या फोटोत ग्रेटा सुंदर दिसत आहे आणि तिचा लुक कॅज्युअल आहे. तिने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे. ती साखरपुड्याची अंगठी या फोटोमध्ये दाखवताना दिसत आहे.


आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 साठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मिशेल मार्शची निवड झाल्यामुळे दुहेरी आनंद झाला आहे. त्यानंतर त्याने UAE आणि ओमानमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी तयार आहे.