चेन्नई: आयपीएल 2021मध्ये मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा जिंकवण्याचा निश्चय रोहित शर्माने केला आहे. सध्या असे दिसत आहे की, जेव्हा रोहित मैदानावर उतरतो तेव्हा तो त्याच्याबरोबर एक खास मिशन देखील पार पाडत आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितने नामशेष झालेल्या गेंड्यांच्या प्रजाती वाचवण्याचा संदेश आपल्या शूजवर लिहून सर्वांना दिला. आता मंगळवारी पार पडलेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने अणखी एक संदेश दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रोहितने निळ्या पाण्यात कासव आहे, असा फोटो असलेले शूज घातले ज्यामधून तो समुद्राला प्लास्टिक मुक्त करण्याचा संदेश देत आहे. वन्यजीव आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी हिटमॅनचा या प्रयोगाचा सगळ्या चाहत्यांनी स्वागत केले आहे.



आता पुढच्या सामन्यात रोहित कोणता संदेश देईल आणि कोणत्या फोटोचा शूज घालेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


9 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबईच्या कॅप्टनने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले होते की, जग चांगले बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे.


लोकांनी रोहिला या विचारांमुळे खूप सपोर्ट केला आणि सोशल मीडिसावर सर्वत्र आता रोहित आणि त्याच्या शूजची चर्चा होत आहे.