IND vs AUS: स्वतःच्याच खेळीवर नाखूश Rohit Sharma; पव्हेलियनमध्ये जाताना पाणावले डोळे
120 रन्सवर रोहित शर्माने आपली विकेट गमावली. विकेट गेल्यानंतर जेव्हा तो पव्हेलियनमध्ये जात होता त्यावेळी तो भावूक झाल्याचं दिसून आलं.
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर सिरीजची पहिली टेस्ट मॅच सध्या नागपूरमध्ये खेळवली जातेय. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिलाच सामना फार रोमांचक होताना दिसतोय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवून दिली. हिटमॅनने (Hitman) तुफान फलंदाजी करत शतक ठोकलंय. मात्र आऊट झाल्यानंतर रोहित स्वतःच्याच खेळीवर नाखूश दिसला.
120 रन्सवर रोहित शर्माने आपली विकेट गमावली. विकेट गेल्यानंतर जेव्हा तो पव्हेलियनमध्ये जात होता त्यावेळी तो भावूक झाल्याचं दिसून आलं. मात्र त्याच्या खेळीमुळे सर्वजण खूश होते, आणि तो ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच त्याचं स्वागत करण्यात आलं. ड्रेसिंग रूममध्ये पाऊल ठेवताच सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
ड्रेसिंग रूममध्ये झालं Rohit Sharma स्वागत
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने पहिल्या टेस्टमध्ये उत्तम कामगिरी केली शतक ठोकलं. टीम इंडियाची डाव त्याने एका बाजून सांभाळला होता. मात्र 120 रन्सवर विकेट गेली तेव्हा रोहित भावूक झालेला दिसून आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पव्हेलियनमध्ये परतत असताना त्याचे डोळेही पाणावल्याचं दिसून आलं.
कांगारूंविरूद्ध एकटा लढला Rohit Sharma
गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. नुकतंच वनडेमध्ये शतक ठोकल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्याने शतक करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नागपूरच्या टेस्टमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा जुना रोहित शर्मा पहायला मिळाला.
नागपूरचं पीच असं आहे जिथे, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव सारखे फलंदाज स्वस्ताक माघारी परतले. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकटाच खेळला आणि खणखणीत शतक मारलं. रोहितने 120 रन्सची उत्तम खेळी केली आहे.
या कारणाने सेंच्युरीनंतरही रोहितने काढलं नाही हेल्मेट
सामान्यपणे कोणताही फलंदाज शतक पूर्ण झाल्यानंतर त्याचं हेल्मेट काढतो. मात्र रोहित शर्माने आज शतक ठोकल्यानंतर असं केलं नाही. याचं कारण म्हणजे, त्यावेळी नागपूर टेस्टमध्ये कठीण परिस्थितीत होती. त्यामुशे ज्यावेळी रोहितचं शतक पूर्ण केलं तेव्हा त्याने हेल्मेट न काढता सेलिब्रेशन केलं.