Rohit Sharma : आता वर्ल्डकप जिंकल्यानंतर...; प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितच्या वक्तव्यामुळे चाहते खूश
Rohit Sharma Press Conference After Asia Cup Won: सामन्यानंतर रोहित शर्माची ( Rohit Sharma ) प्रेस कॉन्फर्न्स झाली, ज्यामध्ये रोहित शर्माच्या एका विधानाने सर्वांचं मन जिंकलं आहे. पाहुयात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नेमकं काय म्हणाला.
Rohit Sharma Press Conference After Asia Cup Won: एशिया कप विजय मिळवत अखेर टीम इंडियाने ( Team India ) आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्माची ( Rohit Sharma ) प्रेस कॉन्फर्न्स झाली, ज्यामध्ये रोहित शर्माच्या एका विधानाने सर्वांचं मन जिंकलं आहे. पाहुयात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नेमकं काय म्हणाला.
काय म्हणाला रोहित शर्मा?
अंतिम सामन्यातील विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पत्रकार परिषदेसाठी पोहोचला. त्यावेळी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या फटाक्यांमुळे त्याला काही काळ शांत बसावं लागलं. दरम्यान यानंतर रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला की, अरे वर्ल्ड कप जिंकल्यावर फोडा ते फटाके. यावेळी त्याठिकाणी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
भारतीय कर्णधार रोहितनेही ( Rohit Sharma ) पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर उत्तरं दिली. यावेळी रोहित म्हणाला की, श्रेयस अय्यर आता जवळजवळ पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याने अनेक तास फलंदाजी आणि फिल्डींगचा जोमाने सरावही केला. मला वाटत नाही की, आपण त्याच्या फिटनेसबद्दल काळजी करण्याची गरज आहे.
एशिया कपमध्ये रोहितचा उत्तम खेळ
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एशिया कप 2023 मध्ये चांगली कामगिरी केली. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. यावेळी रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 10,000 रन्स पूर्ण केलेत. याशिवाय ओपनर म्हणून 8000 रन्स पूर्ण केलेत. आशिया कपमध्ये स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा भारतीय फलंदाज ठरलाय.
भारताचा श्रीलंकेवर मोठा विजय
एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने ( Team India ) श्रीलंकेला विरुद्ध दणदणीत विजय मिळवलाय. भारताने आशिया कपच्या फायनल सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने पराभव केला आहे. गतविजेत्या श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या 51 रन्सने आव्हान पार करताना टीम इंडियाने एकही विकेट न गमावला सामना जिंकला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात गोलंदाज मोहम्मद सिराजने मोलाची भूमिका साकारली.