Deccan Chargers IPL theme song : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या आपल्या फलंदाजीतून धुमाकूळ घालताना दिसत आहे. रोहित शर्माने (Rohit sharma) चेन्नईविरुद्ध खणखणीत शतक ठोकलं अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी रणशिंग फुंकलं. एकीकडे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार, अशी चर्चा होतीये. रोहित पुन्हा कोणत्या संघात जाणार? असा सवाल विचारला जातोय. रोहित पुन्हा डेक्कन चाजर्समध्ये (Deccan Chargers) म्हणजेच आत्ताच्या हैदराबादमध्ये खेळेल, अशी चर्चा देखील कानावर येत आहे. अशातच एका पॉडकास्टमध्ये (Club Prairie Fire) हिटमॅनने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्लब प्रेरी फायरच्या पॉडकास्टमध्ये रोहित शर्माने डेक्कन चाजर्सचा माजी कर्णधार अ‍ॅडम गिलक्रिस्ट याच्यासह टॉक शो केला. त्यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली अन् आपल्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी रोहितने डेक्कन चार्जर्सच्या थीम साँगचे वर्णन आतापर्यंत ऐकलेलं सर्वोत्कृष्ट थीम साँग म्हणून केलं. डेक्कन चार्जर्स फ्रँचायझीने 2009 मध्ये आयपीएल जिंकली होती. या प्रतिष्ठित संघात ॲडम गिलख्रिस्ट, अँड्र्यू सायमंड्स, प्रज्ञान ओझा, आरपी सिंग यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. तर रोहित शर्मा या संघाचा उपकर्णधार होता. रोहितसह बोलताना ॲडम गिलख्रिस्टने डेक्कन चाजर्सचं थीम साँग मोबाईलवरून ऐकवलं. त्यावेळी रोहित खूप खुश झाला. 


मला वाटत नाही की सध्याचे कोणतेही आयपीएल थीम गाणे डेक्कन चार्जर्सच्या गाण्याच्या जवळ आले आहे. मला ते गाणे अजूनही आठवते, असं रोहित शर्मा म्हणाला. त्यावेळी रोहितने विराटसोबतच्या वर्ल्ड कपच्या ओपनिंगवर देखील भाष्य केलं. आम्ही आतापर्यंत भेटलो नाही, विश्वचषकात कोण ओपनिंग करायचं हे आम्ही ठरवलेलं नाही. आजच्या युगात जोपर्यंत तुम्ही माझ्याकडून ऐकत नाही तोपर्यंत किंवा राहुल भाई किंवा अजित भाई यांच्याकडून ऐकत नाही तोपर्यंत काही खरं नाही, असं रोहित शर्मा म्हणाला. 


पाहा Video



दरम्यान, तोंडावर असललेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन रोहित शर्माने बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि टीमचे हेड कोच राहुल द्रविड यांची भेट घेतल्याची बातमी आली होती. त्यावर देखील रोहितने खुलासा केलाय. ही सर्व खोटं असल्याचं रोहितने सांगितलं. अजित आगरकर दुबईमध्ये गोल्फ खेळत आहेत तर राहुल द्रविड बंगळुरुमध्ये त्यांच्या मुलांचा खेळ पाहत आहेत, असंही रोहित शर्माने सांगितलं. आमचं कोणतंही बोलणं झालं नाही, असं रोहितने पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं.