मुंबई : आजपासून भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सिरीजला सुरुवात होणार आहे. पहिला टी-20 सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्माची नवी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्यापासून रोहितही कॅप्टन म्हणून डेब्यू करणार आहे. इतकंच नाही तर न्यूझीलंड विरूद्धच्या या सिरीजमध्ये रोहित 3 मोठे नवीन रेकॉर्ड्स करण्याचीही शक्यता आहे.


टी-20 इंटरनॅशनमध्ये सर्वात जास्त रन्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

190 धावा करताच रोहित शर्मा (3038 धावा) T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणरा फलंदाज ठरणार आहे. या बाबतीत तो विराट कोहलीला (3227 धावा) मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. मात्र, या बाबतीत तो न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल (3147 धावा) यांच्याशी टक्कर देईल. या सिरीजमध्ये विराटला आराम देण्यात आल्याने रोहितला ही संधी आहे.


इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 450 सिक्स


आणखी 3 सिक्स मारताच रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 सिक्स पूर्ण करेल. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. केवळ वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (553) आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (476) यांनी हा आकडा गाठला आहे.


टी-20 इंटरनॅशनलमध्ये 150 सिक्स


रोहित अजून 10 सिक्स मारताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 सिक्सेसचा रेकॉर्ड पूर्ण करेल. हा आकडा गाठणारा तो मार्टिन गप्टिलनंतरचा दुसरा खेळाडू ठरेल.


न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये भारताचं प्लेइंग असं असू शकतं


रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद सिराज,
दीपक चाहर, हर्षल पटेल