Rohit Sharma on MS Dhoni : आयपीएल सुरु होण्यासाठी आता केवळ 2 दिवस उरले आहेत. येत्या 31 मार्चपासून सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलला सुरुवात होणार आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरूशी होणार आहे. दरम्यान ही आयपीएल (IPL 2023) सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) विषयी विविध चर्चा सुरु झाल्यात. धोनीची ही शेवटची आयपीएल असल्याचं देखील म्हटलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान याच मुद्द्यावरून मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठं वक्तव्य केलं आहे. धोनीच्या रिटायरमेंट बद्दल केलेल्या या वक्तव्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. 


MS Dhoni रिटायर होणार?


टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) ने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र अजूनही तो आयपीएल खेळताना दिसतोय. तर यंदाची आयपीएल धोनीची शेवटची आयपीएल असल्याचं बोललं जातंय. तर यावर रोहित शर्माने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 


धोनीबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, धोनी अजून काही वर्ष खेळण्यासाठी फीट असल्याचं मला वाटतं. याशिवाय मला हे त्याचं शेवटचं वर्ष असेल, असं मला नाही वाटतं. मी हे 2-3 वर्षांपासून ऐकतोय की, हे त्याचं शेवटचं वर्ष असेल. मात्र असं काही होणार नाही. 


रोहित शर्मा खेळणार नाही यंदाची आयपीएल?


कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma IPL 2023) यंदाच्या आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. रोहितबाबत अशी माहिती समोर आलीये. रोहित शर्मा हा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर असेल, अशी माहिती मिळालीये. मात्र आता सर्वांच्या मनात प्रश्न असा आहे की, रोहित शर्मा टीममध्ये नसताना कर्णधारपद कोणत्या खेळाडूकडे जाणार आहे?


रोहित शर्माच्या (Rohit Sharma IPL 2023) अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. मात्र कर्णधारपदाचा रेकॉर्ड पाहिला तर रोहित शर्मा यशस्वी कर्णधार असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय.