इंदूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. ओपनर केएल राहुलने या मॅचमध्ये ३२ बॉलमध्ये ४५ रनची खेळी केली. राहुलच्या या खेळीमुळे १४३ रनचं आव्हान पार करणं भारताला सोपं झालं. वानिंडू हसरंगाने राहुलला माघारी धाडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआय आणि टीम प्रशासनाने घेतला. यामुळे शिखर धवनचं टीममध्ये पुनरागमन झालं. दुखापतीमुळे शिखर धवन टीमबाहेर होता. टीममध्ये परतणाऱ्या शिखर धवनने आक्रमक खेळी केली नाही. २९ बॉलमध्ये ३२ रन करुन धवन आऊट झाला.


मॅच संपल्यानंतर राहुलला ओपनिंगला खेळताना रोहित शर्मा आवडतो का शिखर धवन आवडतो? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा 'भारताला जिंकवण्यासाठीची रणनिती ठरवून आम्ही मैदानात जातो. रोहित शर्मा खेळताना गोष्टी सोप्या करतो. पण शिखर धवन आणि माझ्यात नेहमीच स्पर्धा राहिली आहे. माझ्या टेस्ट कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ही स्पर्धा कायम आहे. आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. मला रोहित आणि धवन दोघांबरोबर बॅटिंग करायला मजा येते,' असं राहुल म्हणाला.


भारतीय बॉलरच्या कामगिरीचंही राहुलने कौतुक केलं आहे. या खेळपट्टीवर १७० रनचं आव्हानही योग्य राहिलं असतं. पण श्रीलंकेला छोट्या स्कोअरवर रोखण्याचं श्रेय बॉलरना जातं, अशी प्रतिक्रिया राहुलने दिली.


३ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने १-०ने आघाडी घेतली आहे. आता शुक्रवारी तिसरी टी-२० खेळवण्यात येणार आहे. सीरिजची पहिली टी-२० पावसामुळे रद्द करण्यात आली होती.