Tiger is Back: विजय खेचून आणताच Rohit Sharma ने Virat Kohli ला असं उचलून घेतलं
India vs Pakistan T20 : टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माने विराट कोहलीला उचलून धरलं
virat kohli and rohit sharma : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे. टी20 वर्ल्डकप 2022 मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या विरोधात त्याने धुवांधर खेळी करत पाकिस्ताच्या तोंडातला घास हिसकावून आणला. पराभवाच्या वाटेवर असलेल्य़ा टीम इंडियासाठी विराट कोहलीने विजय खेचून आणला. त्याच्या या कामगिरीनंतर संपूर्ण जगातून त्याचं कौतूक होतंय. भारतच नाही तर क्रिकेट विश्वातील प्रत्येक व्यक्तीला विराटच्या या खेळीचं कौतूक वाटतंय. विराट कोहलीने विजय खेचून आणल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने देखील त्याला उचलून घेतलं.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देखील ट्विट करत हा फोटो शेअर केला आहे. टीम इंडियाच्या विजयावर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.