मुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतोय हा दिग्गज खेळाडू
मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला मैदानाची गरज नाही. इथल्या गल्ली बोळांमध्ये आणि चाळींमध्येही क्रिकेट खेळलं जातं.
मुंबई : मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला मैदानाची गरज नाही. इथल्या गल्ली बोळांमध्ये आणि चाळींमध्येही क्रिकेट खेळलं जातं. भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मानंही लहानपणी अशाच पद्धतीनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आज पुन्हा एकदा रोहित शर्मा त्याच्या लहानपणीसारखा गल्ली क्रिकेटमध्ये रमला. गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ रोहित शर्मानं त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून शेअर केला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानची चौथी वनडे मुंबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. रोहितसाठी हा सामना त्याच्या घरच्याच मैदानात आहे. त्याआधी त्यानं रविवारी मुंबईतल्या मुलांसोबत गल्ली क्रिकेट एन्जॉय केलं.
वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली वनडे भारतानं जिंकली तर दुसरी वनडे टाय झाली. तिसऱ्या वनडेमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. पहिल्या वनडेमध्ये रोहितनं १५२ रनची खेळी केली. तर दुसऱ्या वनडेमध्ये ४ आणि तिसऱ्या वनडेमध्ये ८ रन करून रोहित आऊट झाला. आता चौथ्या वनडे घरच्या मैदानात असल्यामुळे मोठी खेळी करण्यासाठी रोहित उतरेल.