Boxing Day Test : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार का? रोहित शर्मा म्हणतो, `फायनलनंतर माझ्या वेदना...`
Rohit Sharma Press Conference : रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी उत्सुक आहे का? असा तिकरस सवाल रोहितला विचारला गेला. त्यावेळी रोहितने थेट उत्तर देण्यास टाळलं.
Rohit Sharma On T20 World Cup : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day Test) रोहित शर्माच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असणार आहे. अशातच पहिल्या टेस्ट सामन्याआधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत (Rohit Sharma Press Conference ) अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी रोहितने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं. रोहितने नेमकं काय काय म्हटलंय? पाहुया...
काय म्हणाला रोहित शर्मा?
साऊथ अफ्रिकाविरुद्धटची कसोटी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही येथे कधीही मालिका जिंकलेली नाही. आमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. आम्ही मागील दोन वेळा जवळ आलो होतो. पण आम्हा लक्ष साध्य करता आलं नाही. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करून आणखी उत्साहाने पुढे जाण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजांच्या कामगिरीवर आमचं लक्ष असणार आहे. मोहम्मद शमी या सिरीजमध्ये नसेल, त्यामुळे आम्ही त्याला मिस करू, असं रोहित शर्मा याने म्हटलं आहे.
फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिकेत नेहमीच आव्हान असतं. मी आव्हानाची वाट पाहत आहे, असं रोहित शर्मा म्हणतो. सामन्यात प्रत्येक गोलंदाजाची मोठी भूमिका असेल. विकेट्स नंतर कठीण होतात कारण क्रॅक उघडतात आणि बॉल उसळ्य़ा मारतो. त्यामुळे तिथं आव्हानात्मक खेळ असणार आहे.
वर्ल्ड कप फायनलवर काय म्हणाला रोहित?
वर्ल्ड कप स्पर्धेत आम्ही ज्याप्रकारे खेळलो, त्याप्रमाणे तुमची अपेक्षा आहे. वर्ल्ड कपसाठी आम्ही खूप मेहनत घेतली. काही गोष्टी आहेत ज्या आम्ही अंतिम फेरीत चांगल्या होऊ शकल्या नाहीत. आमच्यासाठी खूप अवघड होतं. आम्हाला खूप बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागला. मात्र, पुढील आव्हानांसाठी तुम्हाला तयार रहावं लागेल.
रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी उत्सुक आहे का? असा तिकरस सवाल रोहितला विचारला गेला. त्यावेळी रोहितने थेट उत्तर देण्यास टाळलं. तुम्हाला पुढे जाण्याचा आणि पुढे पाहण्याचा मार्ग शोधावा लागेल. बाहेरच्या जगातून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे मला वैयक्तिकरित्या प्रेरणा मिळाली. मला माहितीये तुम्ही काय काढून घेण्याचा प्रयत्न करत आहात, असं म्हणत रोहितने पत्रकारांना टोला लगावला.
दरम्यान, एक फलंदाज म्हणून मी जमेल तशी फलंदाजी करत आहे आणि माझ्यासमोर जे आहे ते करण्याचा प्रयत्न मी करतोय, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. केएल राहुल आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो या सिरीजमध्ये विकेटकिपिंग करेल, असंही रोहितने यावेळी सांगितलं.