Rohit Sharma : टीम इंडियाचा ( Team India ) आणि मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) कर्णधार रोहित शर्माचे ( Rohit Sharma ) चाहते काही कमी नाहीये. रोहित खराब फॉर्ममध्ये असताना देखील त्याचे चाहते मात्र, त्याच्या समर्थनासाठी उभे असतात. रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) व्हायरल होणारा हा व्हिडीओ एक चाहत्यासोबतचा आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे कारण म्हणजे, एक चाहता सर्वांसमोर खुलेपणाने रोहितकडून ( Rohit Sharma ) किस मागताना कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान या चाहत्याची अजब मागणी पाहून कर्णधार रोहित शर्माने दिलेलं रिएक्शन चाहत्यांना आवडलंय. 


चाहत्याने रोहितकडे मागितलं चुंबन


सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीमचा कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक चाहता मुंबईचा ( Mumbai Indians ) कर्णधार रोहित शर्माला गालावर किस करायला सांगतो. चाहत्यांची ही मागणी ऐकून रोहित शर्माला मोठा धक्काच बसलेला दिसतोय. ( Rohit Sharma in shock after male fan asks for kiss ) हे पाहून रोहित शर्मा तोंड वाकडं करतो आणि बाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्याला बाजूला घेऊन जायला सांगतो. 



अतरंगी चाहत्यांची कमी नाही


रोहित शर्माला भेटलेला हा अतरंगी चाहता काही पहिलाच नव्हता. यापूर्वी एखदा एअरपोर्टवर एका चाहत्याने रोहितला गुलाबाचं फूल दिलं होतं. मुख्य म्हणजे, या वेळी रोहितने ( Rohit Sharma ) त्या चाहत्यालाच आश्चर्याचा धक्का दिला. 


ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्याधील सिरीजदरम्यान ही घटना घडली होती. विशाखापट्टनम एयरपोर्टच्या एअरपोर्टवर रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या एक चाहत्याला प्रपोज केलं होतं. त्यावेळी एक चाहता इंडियाची संपूर्ण टीम बाहेर येण्याची वाट पाहत होता. यावेळी रोहित शर्माला पाहून या चाहत्याने त्याच्या हातात गुलाब दिलं. यावेळी रोहितने गुलाब त्याला देत विचारलं की, Will you marry me?. त्यावेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.