Rohit Sharma : हिटमॅन ऑन `डॉटर ड्यूटी`, लाडक्या लेकीसाठी रोहित शर्माने असं काही केलं की... पाहा Video
Rohit Sharma Viral Video : कितीही केलं तरी लेकीसाठी बापाची माया कमी होत नाही. माणूस मोठा झाला तरी आपलं कुटूंब त्याच्यासाठी प्राधान्य असतं. अशातच आता मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Rohit Shamra with daughter Samaira Video : आयपीएल सुरू झाली पण मुंबईची लोकल काही केल्या सुटेना. मुंबई इंडियन्स (Mumbai indians) यंदाच्या हंगामात रोहित शर्मा नव्हे तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. चालू हंगामात मुंबई इंडियन्सला विजयाचा सुर गवसलेला नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा रोहित शर्माकडे पलटणचं नेतृत्व द्यावं, अशी मागणी केली जात आहे. मात्र, रोहितने आता मन ओसरवल्याचं स्पष्ट दिसतंय. रोहित मुंबईचं नेतृत्व करणार की नाही? यावर चर्चा सुरू असताना आता रोहित शर्माच्या एका कृतीने अनेकांची मनं जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये रोहित आपल्या लाडक्या लेकीसोबत दिसतोय.
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी, याचा प्रत्यय वर्ल्ड कपनंतर रोहितची लेक समायरा हिच्या रिअॅक्शनवरून दिसून आलं होतं. अशातच आता रोहितने आपल्या लेकीसाठी असं काही केलं की, लोकांनी त्याचं तोंडभरून कौतूक केलंय. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सची टीम आगामी सामन्यासाठी प्रवासाला निघाले होते. त्यावेळी रोहित शर्माची पत्नी आणि मुलगी त्याच्या सोबत होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सची टीम बसने प्रवास करणार असताना हॉटेलबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली.
सिक्युरिटीसह मुंबई इंडियन्सची टीम मैदानात निघाली असताना रोहितने झोपलेल्या समायराला घेतलं होतं. त्यावेळी रोहितचे सहकारी देखील सोबत होते. मात्र, रोहितने लाडक्या लेकीला कोणाकडेही सोपवलं नाही. त्याने स्वत: लेकीला घेतलं अन् बाकीच्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तोंडावर बोट ठेऊन शांत रहा, असं रोहितने सांगितलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय.
मुंबई इंडियन्स संघ - इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, देवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (C), पियुष चावला, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, क्वेना माफाका, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, नेहल वढेरा, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव, विष्णू विनोद, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, मोहम्मद नबी, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज.