Rohit Sharma Requests cameraman : गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्स (MI) मॅनेजमेंट यांच्यात आलबेल नसल्याचं दिसून येतंय. आगामी आयपीएलमध्ये रोहित मुंबईच्या टीमची साथ सोडणार अशीही चर्चा रंगू लागली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या अभिषेश नायरसोबत बोलताना रोहित शर्माचा एक ऑडियो लीक झाला होता. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा कॅमेरामॅनला (Rohit Sharma Requests cameraman) हात जोडून विनंती करताना दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅमेरामॅन समोर रोहितने का जोडले हात? 


वानखेडे स्डेडियमवर सामन्यापूर्वी रोहित शर्मा काही लोकांशी मैदानावर चर्चा करताना दिसला. यावेळी आजूबाजूला कॅमेरा असल्याचं रोहित शर्माला कळलं. तेव्हा रोहितने ताबडतोब कॅमेरामॅनला कॅमेरा बंद करण्याची विनंती केली. रोहितची ही घटना देखील कॅमेरात कैद झाली आहे. अभिषेत नायरसोबत झालेल्या प्रकरणानंतर रोहितने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. रोहित शर्माचा स्टंप माईक आवाज देखील व्हायरल होतात. त्याची गार्डनवाली क्लिप व्हायरल देखील झाली होती.


कॅमेरामॅनला काय म्हणाला रोहित?


रोहित कॅमेरामॅनला म्हणतोय की, “भाई प्लीज ऑडियो बंद कर. खरं सांगतो त्या एका ऑडियोने माझ्या वाट लावली आहे.” हे सांगताना रोहित शर्माने कॅमेरामॅनसमोर चक्क हात जोडले आहेत. त्यावेळी त्याबाजूला उभ्या असलेल्या खेळाडूंना देखील हसू आवरलं नाही. रोहितचा हा व्हिडीओ सध्या तुफान शेअर देखील केला जातोय.


पाहा Video



मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.


लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.