छत्रपतींची मूर्ती दिसताच रोहित शर्माच्या तोंडून निघालं...! Video व्हायरल
एक अशी घटना घडली ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
मुंबई : सध्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि विकेटकीपर ऋषभ पंत यांच्यामध्ये झालेलं इन्स्टाग्राम लाईव्ह सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालंय. या लाईव्हदरम्यान अनेक मजेशीर किस्से घडले. यावेळी रोहित आणि सुर्यकुमार यादवने एका चाहत्याशीही संवाद साधला. याचदरम्यान एक अशी घटना घडली ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव एका चाहत्याशी गप्पा मारत होते. सूर्यकुमार, रोहित आणि पंत व्हिडीओ चॅटवर असल्याचं पाहून त्याला विश्वासच बसत नव्हता. दिग्गज खेळाडूंशी आपण संवाद साधतोय यावर तो मराठमोळा चाहता आई शप्पथ असं म्हणाला.
दरम्यान या मराठमोळ्या चाहत्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये जिकलेल्या ट्रॉफी रोहित आणि सुर्यकुमारला दाखवल्या. यावेळी घरात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील त्याने खेळाडूंना दाखवली. महाराजांची मूर्ती पाहताच रोहित शर्मा लगेच ‘जय हो’अशी घोषणा करताना दिसला. त्याच्या या कृत्यामुळे सगळेजण त्याचं कौतुक करताना दिसतायत.
दरम्यान जेव्हा चाहता आई शप्पथ म्हटल्यावर “मराठी माणूस आला वाटतं” असं लगेच रोहितने म्हटलं. यावेळी चाहत्याने मुंबईत फार पाऊस असल्याचं सांगितलं. यानंतर सूर्यकुमारनेही त्याच्या रुमबाहेरील दृष्य दाखवत पाऊस आहे, असं मराठीत म्हटलंय. हा व्हिडीयो मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलाय.