कोलकाता : कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने उत्तम अर्धशतक केलं. त्यानंतर शेवटी टीम इंडिया काही प्रमाणात डगमगणार असं दिसत असतानाच दीपक चहरने गोंधळ घालत तुफान फलंदाजी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक चहरने भारतीय डावाच्या 20व्या ओव्हरमध्ये 19 रन्स लुटले. यादरम्यान त्याने अॅडम मिल्नेच्या चेंडूवर दोन फोर आणि एक शानदार सिक्स मारला. दीपक चहरने आपल्या छोट्या खेळीत 8 चेंडूमध्ये खेळून 21 रन्स केले. 


दीपक चहरच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावरच भारतीय संघाला 184 धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये दीपक लाँग शॉर्ट्स मारले. हे शॉट्स पाहिल्यावर पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या रोहित शर्माने त्याच्या शॉटला सॅल्यूट केला.



टीम इंडियाने 140 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे मोठी धावसंख्या करणं कठीण होईल असं वाटत होतं. पण दीपक चहर आणि हर्षल पटेल यांनी शेवटी चमत्कार केला. हर्षल पटेलनेही 11 चेंडूत 18 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 फोस आणि 1 सिक्स लगावला.


कोलकातामध्ये भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 56 रन्स केले. रोहितसोबत सलामीला आलेल्या इशान किशननेही चांगली सुरुवात केली. त्याने 29 रन्स केले. शेवटी श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर या जोडीनेही वेगवान धावसंख्या करण्याचा प्रयत्न केला.