कर्णधार रोहितने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांच्या रणनीतीबद्दल केलंय हे विधान
इंडियन प्रीमियर लीगला उद्यापासून सुरुवात होते. आयपीएलमधील पहिला मुकाबला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. या सामन्यासाठी रोहितने खास रणनीती तयार केली. या सामन्यासाठी फलंदाजांचा क्रम कसा असणार आहे याबाबत रोहितने कोणतेही विधान करण्यास नकार दिलाय.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगला उद्यापासून सुरुवात होते. आयपीएलमधील पहिला मुकाबला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. या सामन्यासाठी रोहितने खास रणनीती तयार केली. या सामन्यासाठी फलंदाजांचा क्रम कसा असणार आहे याबाबत रोहितने कोणतेही विधान करण्यास नकार दिलाय.
पत्रकारांशी बोलताना रोहित म्हणाला, पहिल्या सामन्यात फलंदाजीचा क्रम कसा असणार आहे याचा खुलासा मी करणार नाहीये. आमची मधली फळी चांगली आहे. आमच्याकजे एल्विन लुईस आणि ईशन किशानच्या रुपात चांगले सलामीचे फलंदाज आहेत. आम्ही सात तारखेला ठरवू की मी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार आहे.
आयपीएलच्या आधीच्या सीझनमध्ये रोहित मधल्या फळीत उतरला होता. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास रोहित म्हणाला, आमच्याकडे जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्यासारखे खेळआडू आहेत ज्यांनी स्वत:ला सिद्ध केलेय. दरम्यान आम्हाला हरभजनची कमी जाणवेल. त्याच्याकडे खूप अनुभव आहे त्यामुळे त्याची भरपाई करणे कठीण आहे.
मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवले होते. तीनही वेळा रोहितच मुंबईचा कर्णधार होता. आता यंदाही आयपीएलचे जेतेपद मिळवण्याचे रोहितचे लक्ष्य आहे. याबाबत बोलताना रोहित म्हणाला, माझे ध्यान छोटे लक्ष्य नव्हे तर मोठ्या लक्ष्यावर आहे. आयपीएलचे जेतेपद पुन्हा जिंकणे हे माझे लक्ष्य आहे. आयपीएलमध्ये अनेक आव्हाने असणार आहेत. त्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागेल.