बंगळूरू : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात पिंक-बॉल टेस्ट खेळली जातेय. बंगळूरूच्या मैदानावर हा सामना सुरु आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून टीम इंडिया विजयापासून केवळ 9 विकेट्स दूर आहे. दरम्यान टीम इंडियाचा दुसरा डाव सुरु असताना एक अपघात घडलाय. भारताचा कर्णधार रोहित शर्माने खेळलेल्या एका शॉट खेळला. यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूला दुखापत झाली असून त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या डावात सातव्या ओव्हरमध्ये सुरंगा लकमलच्या बॉलवर रोहित शर्माने एक शॉट खेळला. हा शॉट बॅकवर्ड पॉईंटजवळ गेला. तेव्हा श्रीलंकेतचा के.पी जयाविक्रमा फिल्डींग करत होता. यावेळी तो बॉल थेट त्याच्या गुडघ्यावर जाऊन लागला आणि तो तिथेच कोसळला. 


जयाविक्रमाला झालेली दुखापक इतकी गंभीर होती की, त्याला तातडीने उचलून मैदानाबाहेर न्यावं लागलं. पी. जयाविक्रमालाने गेल्या डाव्यामध्ये तीन विकेट काढले होते. यावेळी हनुमा विहारी, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीला त्याने पवेलियनमध्ये पाठवलं होतं.


पहिल्या दिवशी फॅनचं नाक फ्रॅक्चर


भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात पहिल्या दिवशी रोहित शर्मा फलंदाजी करत होता. यावेळी रोहितला शॉर्ट बॉल मिळाला जो त्याने मिड विकेटच्या वर मारला. हा बॉल थेट स्टँडमध्ये जाऊन पडला. तेव्हाच एका एका प्रेक्षकाने हा बॉल कॅच करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बॉल त्याला कॅच करता आलं नाही. 


बॉल त्यावेळी या चाहत्याच्या नाकावर जाऊन बसला आहे. त्यामुळे त्याच्या नाकावर मोठा कट आला आणि रक्तस्राव झाला. लगेचच या व्यक्तीला रूग्णाला दाखल केलं आणि एक्सरे काढला. त्यावेळी त्यांच्या नाकाला फ्रॅक्चर असल्याचं समोर आलं.


आज पिंक टेस्ट बॉलचा तिसरा दिवस आहे. टीम इंडियाकडे दुसऱ्या डावात 143 धावांची आघाडी होती. आणि दुसरा डाव हा 9 बाद 303 धावांवर घोषित केला. यामुळे लंकेला विजयासाठी 447 धावांचं तगडं आव्हान मिळालं आहे