Rohit Sharma : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडिया ( Indian Cricket Team ) ला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) परफॉर्मन्स देखील काही फारसा चांगला दिसून आला नाही. अशावेळी त्याच्या कर्णधारपदावरून आणि फॉर्मवरून अनेक टीका करण्यात आल्या. सोशल मीडियावर येत्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्माला ( Rohit Sharma ) आराम घेणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान याबाबत आता मोठी माहिती समोर आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या ( BCCI ) एक वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भातील गोष्टी स्पष्ट केल्या आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आराम करणार नाहीये. तो वेस्ट इंडिजच्या पूर्ण दौऱ्यासाठी उपलब्ध असणार आहे. 


टीम इंडिया जाणार वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर 


जुलैमध्ये टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी भारतीय टीम 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळणा आहे. यामध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध टीम इंडिया ( Team India ) यांच्यात पहिल्यांदा टेस्ट सामने रंगणार आहे. यापूर्वी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) या दौऱ्याच्या टेस्ट सिरीजमध्ये उपलब्ध नसेल, अशी चर्चा होती.  


इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या ( BCCI ) एका अधिकाऱ्याने माहिती दिलीये की, रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पूर्णपणे फीट आहे आणि सिलेक्शनसाठी तो उपलब्ध आहे. या सिरीजपूर्वी त्याला चांगला ब्रेक मिळेल आणि यामुळे त्याच्या वर्कलोक मॅनेजमेंटची ( Workload management ) कोणतीही चिंता नसेल. वेस्ट इंडिजच्या सिरीजमध्ये तो टीमचं नेतृत्व करणार आहे.


वेस्ट इंडिज आणि भारत ( INDIA ) यांच्यातील पहिला टेस्ट सामना 12 जुलैपासून खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलै रोजी रंगणार आहे. पहिला सामना डॉमिनिकामध्ये तर दुसरा सामना त्रिनिदादमध्ये होणार आहे. यानंतर वनडे आणि टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर टीम इंडियाची ( Team India ) ही पहिली सीरिज असणार आहे.