Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये नुकतंच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवण्यात आली. चौथा टेस्ट सामना ड्रॉ झाल्यानंतर टीम इंडियाने 2-1 ने सिरीज जिंकली. या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने अवघा एकच सामना जिंकला. चौथा सामना ड्रॉ झाल्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वितरण करण्यात आलं. दरम्यान यावेळी ट्रॉफी घेऊन टीमकडे येत असताना के एक राहुलसोबतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 


रोहितने केएल राहुलला केलं सर्वांसमोर इग्नोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या दरम्यान रोहित शर्मा ट्रॉफी घेऊन टीमजवळ येत होता. याचवेळी टीम इंडियाचा ओपनर फलंदाज केएल राहुल ट्रॉफी पकडण्यासाठी पुढे आला. त्याने ट्रॉफीला हात देखील लावला. मात्र रोहितने त्याच्या हाती ट्रॉफी न देता पुढे जाऊन सुर्यकुमारच्या हाती सोपवली.


चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, रोहितने केएल राहुलला इग्नोर केल्याचं दिसून येतंय. रोहित शर्माच्या या अशा वागणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. 


केएल राहुल खराब कामगिरीमुळे बाहेर


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी केएल-राहुलला दोन टेस्ट सामन्यांसाठी उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्या आली होती. मात्र त्याला या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर त्याला पुढच्या दोन टेस्ट सामन्यांमधून बाहेर तर काढलंच, शिवाय उपकर्णधारपद देखील काढून घेतलं.



टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी (Ind vs Aus) होणार आहे. जे आधीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून या कालावधीत होणार असून 12 जून रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी राखीव जागाही ठेवण्यात आली आहे. टीम इंडियाने (Team India) सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी त्याला न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. परिणामी न्यूझीलँडने श्रीलंकेचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. 


त्याचा थेट फायदा भारताला झाला आणि अंतिम फेरीचं गणित सुटलं. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी काहीही करून चार सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकायची होती. पण चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या चिवट खेळीने सर्व गणित फिस्कटले आहे.