मुंबई : रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली आणि केएल राहुल संघात परतले आहेत. अशा परिस्थितीत रोहितसाठी सर्वात मोठी समस्या प्लेइंग-11 निवडण्याची असेल. मात्र, या काळात बुमराहच्या दुखापतीमुळे रोहितसमोर नवं आव्हान उभं ठाकलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमीच्या गैरहजेरीमुळे टीम इंडिया व्यवस्थापनाला आधीच टीकेला सामोरं जावं लागतंय. शिवाय रोहितलाही अनेक गोष्टींमध्ये शमीची आठवण येत असल्याचं आता समोर आलंय. रोहितने स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यासोबत लाइव्ह व्हिडिओ चॅटवर शमीशी संबंधित आठवणी शेअर केल्या.


या शोमध्ये, जेव्हा रोहितला विचारलं की, त्याला नेटमध्ये सामना करणं सर्वात कठीण कोणते गोलंदाज आहे, तेव्हा त्याने मोहम्मद शमीचे नाव घेतलं.


यावेळी रोहित शर्मा म्हणाला, "केवळ प्रॅक्टिससाठी नेहमीच खेळपट्ट्या ओलाव्याने हिरव्या असतात. जेव्हा शमी हिरवीगार खेळपट्टी पाहतो तेव्हा तो अधिक बिर्याणी खाऊन येतो. त्याला बिर्याणी, मटण, नल्ली निहारी खायला द्या. तो या सर्व गोष्टी घेऊन झोपतो."


या काळात नेटमध्ये शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यातील खडतर स्पर्धाही रोहितने मान्य केली. रोहित म्हणाला, बुमराहला नेटमध्ये सामना करणंही कठीण आहे. मी 2013 पासून शमीसोबत खेळतोय. पण हो, सध्या बुमराह आणि शमी यांच्यात हेल्मेटचा सर्वाधिक फटका कोणाला बसेल याची स्पर्धा सुरू आहे. 


यावेळी रोहित शर्माने अजून एका गोलंदाजाचं नाव घेतलं. रोहित म्हणतो, फक्त शमीच नाही तर इशांत शर्मालाही जेवणाचा शौक आहे.