T20 World Cup: इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची  मालिका 2-1 ने भारताने जिंकली. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याने भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं. त्याचबरोबर खेळात आणखी सुधारणा करण्याची गरज देखील व्यक्त केली. यादरम्यान रोहित शर्माने लेग-स्पिनर युजवेंद्र चहलबद्दल मोठे विधान केले आणि टी-20 विश्वचषक 2021 मध्ये न खेळल्याबद्दल दुर्दैवी म्हटलं आहे. चहलबद्दल बोलताना रोहित म्हणाला, 'तो संघाचा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे खूप अनुभव आहे आणि तो सर्व फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करत आहे. गेल्या टी-२० विश्वचषकात तो खेळला नाही हे दुर्दैव आहे. पण तो ज्या पद्धतीने परतला आहे त्यामुळे मी खूश आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडकर्त्यांनी संधी दिली नाही


युजवेंद्र चहल गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा भाग होऊ शकला नाही. त्याला निवड समितीने संघात स्थान दिले नाही. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण युजवेंद्र चहलने आयपीएल 2022 मधून शानदार पुनरागमन केले आहे आणि आता तो या वर्षी टी-20 विश्वचषकात खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावरही युजवेंद्र चहलने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत युझवेंद्र चहल हा टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या मालिकेत त्याने 5.35 च्या इकॉनॉमीने धावा देत 7 विकेट घेतल्या. त्याचबरोबर युजवेंद्र चहलची टी-20 मालिकेतील कामगिरीही चांगली होती. T20 मालिकेत त्याने 7.00 इकॉनॉमीने धावा दिल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या खेळानंतर आगामी T20 विश्वचषकासाठी कर्णधार रोहित शर्माची पहिली पसंती बनला आहे.


टीम इंडियाला या वर्षाच्या शेवटी टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात जायचे आहे. या T20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी इंग्लंडचा दौरा खूपच चांगला होता. या दौऱ्यात संघाने टी-20 मालिकेबरोबरच एकदिवसीय मालिकेतही चांगली कामगिरी केली.