IND vs AUS: 7 महिन्यांनंतर Rohit Sharma वनडे टीममध्ये `या` घातक खेळाडूची करणार एन्ट्री
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाने अचानक सर्वात मोठ्या मॅच विनरचा टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू केवळ एकट्याच्या बळावर संपूर्ण सामना फिरवू शकतो.
IND vs AUS, ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 17 मार्चपासून 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही वनडे सिरीज जिंकण्यासाठी मोठी खेळी खेळलीये. या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 7 महिन्यांनंतर एका घातक खेळाडूचा वनडेच्या टीममध्ये (Odi team) प्रवेश करणार आहे. हा खेळाडू भारतासाठी स्वबळावर सामना जिंकू शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सिरीजमधील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
7 महिन्यानंतर होणार या खेळाडूची एन्ट्री
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाने अचानक सर्वात मोठ्या मॅच विनरचा टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू केवळ एकट्याच्या बळावर संपूर्ण सामना फिरवू शकतो. हा खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये रवींद्र जडेजावर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना फिनिशरची भूमिका देखील उत्तम पद्धतीने बजावतो. केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजी आणि फिल्डींगमध्येही त्याचा खेळ चांगला आहे. टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी रोहितला या खेळाडूकडून खूप मदत मिळू शकतो.
रवींद्र जडेजाने गेल्या काही काळात गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डींग यांच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय. जडेजाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्यामुळेच फलंदाजी, गोलंदाजी याशिवाय फिल्डींगमध्येही रवींद्र जडेजाचे योगदान टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचं आहे. या तिन्हीमध्ये रवींद्र जडेजाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा मॅचविनर असल्याचंही सिद्ध झालंय.
रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या वनडेतून बाहेर
बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आल्यानुसार, केवळ पहिल्या सामन्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थितीत असणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी टीमच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्माच टीमचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या वनडेसाठी उपस्थित राहू शकणार नाही. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सिरीजमध्ये उत्तम खेळ करत शतक झळकावलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला त्याची उणीव भासू शकते.
IND vs AUS: वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), आर जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेन्द्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट