मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची फॅन फॉलोइंग कोणत्याही बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. टीम इंडियाच्या कर्णधारावर चाहत्यांचं प्रेम अनेक प्रसंगी दिसून आलंय. याची प्रतिची पुन्हा एकदा पहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच प्रकार पुन्हा एकदा मुंबईत पाहायला मिळाला. आशिया कप 2022 च्या आधी रोहित मुंबईतील एका हॉटेलमध्ये जाताना दिसला होता. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती.


Rohit Sharma ची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक


मंगळवारी, 16 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरून तुम्हाला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या फॅन फॉलोइंगची चांगली कल्पना आली असेल. या व्हिडिओमध्ये हिटमॅन मुंबईतील एका हॉटेलमध्ये जाताना दिसला. त्याला पाहण्यासाठी चाहते हॉटेलबाहेर पोहोचले होते.



रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी एवढी होती की तिथून बसही जाऊ शकत नव्हती आणि रोहित कुणासोबत फोटोही काढू शकत नव्हता. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


या व्हिडीयोमध्ये, इतक्या मोठ्या संख्येने चाहत्यांना पाहून रोहित शर्माला देखील धक्का बसला. चाहत्यांची इतकी मोठी गर्दी पाहून त्याने डोक्यावर हात मारून घेतला. दरम्यान सुरक्षिततेसाठी त्याला काही काळ हॉटेलमध्येच थांबावं लागलं.