मुंबई : टीम इंडियाची कमान विराट कोहलीनंतर आता रोहित शर्माने सांभाळली आहे. रोहितने कर्णधारपद स्विकारल्यापासून टीम इंडिया वियजाच्या रथावर स्वार आहे. सध्या पाहिलं तर टॉसंही रोहित शर्माच्या बाजूने आहे, कारण रोहित सलग टॉस जिंकतोय. दरम्यान याचसंदर्भात मंगळवारी कर्णधार रोहितने टॉस संदर्भात ट्विट केलंय. मुख्य म्हणजे ट्विट रोहितने केलंय मात्र ट्रोल विराट कोहली झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, "मला कॉईन टॉस करणं फार आवडतं. खासकरून तेव्हा जेव्हा तो माझ्या बाजूने निर्णय देतो."


रोहितच्या या ट्विटवरून लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. आणि यावरून नेटीझन्सने माजी कर्णधार विराट कोहलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण टॉसच्या बाबतीत विराट कोहलीचा रेकॉर्ड नेहमीच खराब राहिला आहे.


टेस्ट, वनडे किंवा टी-20 कर्णधार म्हणून विराट कोहली अधिकवेळा टॉस हरला आहे. 



यानंतर नेटीझन्सनी काही फोटो पोस्ट केले आहेत. तर काही लोकांनी यावर मीम्स तयार करत रोहितचं अकाऊंट हॅक झाल्याचं म्हटलंय. इतकंच नव्हे विराटच्या फॅन्सने अकाऊंट हॅक केलं असल्याचंही म्हटलं गेलं.





दरम्यान अधिकतर लोकांना रोहितच्या या ट्विटचा अर्थच कळला नाही. कारण यामध्ये कॉईन पोटात जाण्याची गोष्ट केली आहे. दरम्यान हे ट्विट एखाद्या जाहिरातीसंबंधी असल्याचंही बोललं जातंय.