KL Rahul : केएल राहुलचा (KL Rahul) खराब फॉर्म हा संपूर्ण टीम इंडियाचा (Team India) चिंतेचा विषय बनला आहे. सतत मिळणाऱ्या संधींमधूनही राहुल चांगली कामगिरी करू शकत नाहीये. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला (Shubman Gill) टीमबाहेर ठेवत उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) ला टीममध्ये संधी दिली. हिटमॅनने राहुलला संधी दिली मात्र, त्याला यंदाही संधीचं सोनं करता आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

177 वर ऑस्ट्रेलियाचा ऑलआऊट झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मैदानात उतरत तुफान फलंदाजी केली. मात्र दुसऱ्या बाजूने उपकर्णधार के.एल राहुल ऑस्ट्रेलियाचा स्पिनर गोलंदाज टॉड मर्फीला विकेट देऊन बसला. राहुलची विकेट गेल्यानंतर त्याच्या खराब शॉट सिलेक्शनवर रोहित शर्माने भर मैदानात नाराजी व्यक्त केली. ही नाराजी रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.


गेल्या काही काळापासून राहुल (KL Rahul) त्याच्या खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. अशातच आजच्या सामन्यात देखील त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये 71 बॉल्समध्ये त्याने अवघे 20 रन्स केले.


केएल राहुलच्या खराब शॉर्टमुळे रोहितही नाराज


भारताच्या पहिल्या डावामध्ये 23.5 च्या ओव्हरमध्ये राहुल टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर त्याच्याच हातात कॅच देऊन बसला. यावेळी नॉन-स्ट्राइकर एंडवर उभा असलेला ओपनर फलंदाज रोहित शर्मा निराश झाला. त्याची ही निराशा कॅमेरामध्ये कैद झाली. 



भारतीय गोलंदाजांची कमाल


कॅप्टन पॅट कमिन्सचा (Pat Cummins) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फेल ठरला. सुरूवातीला रोहितने मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपवला. त्याचं फळ टीम इंडियाला मिळालं. 2 धावांच्या स्कोअरवर कांगारू संघाला पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजा तीन चेंडूत एक धाव काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 15 षटकांत 2 गडी गमावून 36 धावा केल्या होत्या.  त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही.


177 स्कोरवर ऑल-आऊट झाली ऑस्ट्रेलिया


ऑस्ट्रेलियासाठी सामन्याचा पहिला दिवस फारच खराब गेल्याचं दिसून आला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने अवघ्या 2 रन्सवर ओपनर जोडी गमावली. यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी मिळून ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. दोघांमध्ये 82 रन्सची पार्टनरशिप झाली. मात्र या दोघांची जोडी तोडण्यात रविंद्र जडेजाला यश मिळालं