Rohit Sharma: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदा रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल; नव्या भूमिकेसाठी तयार हिटमॅन
Rohit Sharma Mumbai Indians: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्मा आता 18 मार्च रोजी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. आता मुंबई इंडियन्सच्या टीमने यावेळी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Rohit Sharma Mumbai Indians: येत्या शुक्रवारपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. यावेळी सर्व टीमच्या खेळाडूंनी प्रॅक्टिस सेशनमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अनेक मोठे बदल पहायला मिळाले. यावेळी टीममध्ये रोहिता डावलून हार्दिक पंड्याला कर्णधार करण्यात आलं. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा ट्रॉफी जिंकली होती. अशातच रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला आहे.
मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये रोहित शर्माची एन्ट्री
कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्मा आता 18 मार्च रोजी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. आता मुंबई इंडियन्सच्या टीमने यावेळी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो नेटवर सराव करताना दिसतोय. तो चांगले शॉट मारताना दिसतोय. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिलीये. रोहित शर्माने 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे नेतृत्व केलं होतं. आता 11 वर्षांनंतर तो एक खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
विस्फोटक बॅटिंग करतोय रोहित शर्मा
रोहित शर्मा नेहमीच स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. रोहित शर्मा एक असा प्लेअर आहे जो गमवालेल्या सामन्याचं चित्र कधीही पालटू शकतो. मुंबई इंडियन्स टीमसाठी ओपनिंग करताना त्याने अनेक सामने जिंकले आहेत. रोहित पुल शॉट्स खूप चांगले खेळतो. त्याचा हा शॉट खूप प्रसिद्ध आहे.
कशी आहे आयपीएलमधील रोहित शर्माची कामगिरी?
रोहित शर्मा 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावे एक शतक देखील आहे. आतापर्यंत त्याने 243 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 6211 रन्स केलेत. यावेळी रोहितच्या खात्यात 42 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 130.05 आहे. मुंबई इंडियन्सपूर्वी रोहित डेक्कन चार्जर्सकडूनही खेळला आहे. डेक्कन चार्जर्सच्या वतीने आयपीएल 2009 मध्येही त्याने विजेतेपद पटकावलं होतं.
IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संघ -
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.