Team India : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सिरीजनंतर टीम इंडियाला ( Team India ) तब्बल महिन्याभराची मोठी सुट्टी मिळाली होती. या मोठ्या सुट्टीनंतर आता वेस्ट इंडिजविरूद्धच्या ( West Indies ) सामन्यासाठी टीम इंडिया तयार आहे. टीम इंडिया ( Team India ) सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहचली असून त्या ठिकाणी 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहे. 12 जुलै रोजी पहिला सामना खेळवला जाणार असून टीम इंडियाचे खेळाडू समुद्रावर वॉलिबॉल खेळताना दिसले.


वेस्ट इंडिजच्या बीचवर खेळाडूंची धमाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात टीम इंडियाला ( Team India ) ऑस्ट्रेलिया टीमकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता टीम थेट विंडीज ( West Indies ) दौऱ्यावर पोहोलचीये. यावेळी बीसीसीआयने टीमचा मजा मस्ती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. 


बीसीसीआयने ( BCCI ) पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचे ( Team India ) खेळाडू समुद्रावर वॉलीबॉल खेळताना दिसतायत. यामध्ये विराट कोहली ( Virat Kohli ) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma ) एकमेकांविरूद्ध खेळतायत. दोघंही खेळाडू त्यांची टीम जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतंय. 



कोच राहुल द्रविडही खेळाडूंमध्ये झाले सामील


टेस्ट सिरीज सुरु होण्यापूर्वी टीमचे ( Team India ) खेळाडू बीचचा आनंद घेतायत. यावेळी वॉलीबॉल खेळताना किंग कोहलीच्या टीमकडून आर अश्विन आणि कोच राहुल द्रविड खेळताना दिसले. तर समोरच्या टीममध्ये म्हणजे रोहित शर्माकडून ईशान किशन आणि इतर युवा खेळाडूंची फौज खेळताना दिसली. बीसीसीसआयने पोस्ट केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना मात्र फारच आवडलाय. 


रहाणेकडे उपकर्णधार पदाची धुरा


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेने उत्तम कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर टेस्ट टीमच्या उपकर्णधार पदाची अजिंक्य रहाणेवर सोपवण्यात आलीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाकडून एकटा अजिंक्य रहाणे कांगारूंशी लढला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात त्याने तब्बल 18 महिन्यांनी कमबॅक करत संधीचं सोनं केलं होतं. या दौऱ्यावर टीम इंडियाला 2 टेस्ट खेळायच्या आहेत. 


  • पहिला टेस्ट सामना - 12 ते 16 जुलै, डॉमिनिका

  • दुसरा टेस्ट सामना - 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

  • पहिली वनडे - 27 जुलै, ब्रिजटाऊन

  • दुसरी वनडे - 29 जुलै, ब्रिजटाऊन

  • तिसरी वनडे - 15 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

  • पहिली T20 - 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

  • दुसरी T20 - 6 ऑगस्ट, गयाना

  • तिसरी T20 - 8 ऑगस्ट, गयाना

  • चौथी T20 - 12 ऑगस्ट, फ्लोरिडा

  • पाचवी T20 - 13 ऑगस्ट, फ्लोरिडा