मुंबई : सोमवारी आयपीएलमध्ये मंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान नव्या एका वादाला तोंड फुटलं आहे. या सामन्यात मुंबईच्या टीमला 9 व्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मात्र या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा देण्यात आलेल्या आऊट करारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटला बॉल लागला नव्हता. मात्र थर्ड अंपायरच्या रिप्लेमध्ये एज दाखवण्यात आला. परिणामी रोहितला आऊट करार दिला गेला. याच मुद्द्यावरून वाद झालेला दिसला.



रोहितला आऊट दिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी एका युजरने, आयपीएल जगातील सर्वात मोठ लीग मानली जाते, आणि या निम्न स्तराची अंपायरिंग होताना दिसतेय. शिवाय वापरण्यात येणारी तंत्रज्ञानही योग्य नसल्याचं, म्हटलंय.



चूक नेमकी कोणाची?


रोहित शर्माच्या बॅटचा एज रिप्लेमध्ये दिसला. मुळात तंत्रज्ञानाद्वारे बॅट आणि बॉलमधील संपर्क दिसून येतो. स्क्रीनवर स्पाइक दिसल्यास, चेंडूने त्या जागेला स्पर्श केला आहे. मग ती बॅट असो, पॅड असो किंवा बॅट्समनची बॉडी असो. परंतु त्याचा निगेटिव प्वाइंट असा आहे की, स्पाइक कोणत्याही आवाजाने देखील दिसून येतो.


रोहित शर्माच्या विकेटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी हॉटस्पॉटची मागणी केली. हॉटस्पॉटचा वापर याआधीही झाला आहे, मात्र आयपीएलमध्ये त्याचा वापर करण्यात आलेला नाही. हॉटस्पॉट हे असं तंत्र आहे, ज्यामध्ये रिप्ले काळ्या आणि पांढर्‍या रंगात दाखवला जातो. जेणेकरून बॉलने संपर्क साधलेली जागा स्पष्टपणे दिसते.